Explore Our Impact Areas
Want to see our areas of Work. Click here to View More
तुमच्या कलेचा सन्मान करा — योग्य श्रेणी निवडा आणि नामांकन करा!
शिर्डी, दि. १७ मे २०२६ – “बी द चेंज फाउंडेशन” आयोजित सौंदर्य कला पुरस्कार २०२६ हा राज्यस्तरीय भव्य पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १७ मे २०२६ रोजी शिर्डी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्रातील सौंदर्य, कला, मेकअप, हेअर स्टायलिंग, स्किन केअर तसेच ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यावसायिक, प्रशिक्षक आणि कलाकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सौंदर्य व कला क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करणे, त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणे आणि नवोदित कलाकारांना प्रेरणा देणे हा या पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश होता. राज्यभरातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे परीक्षण करून विविध क्षेत्रांतील गुणवंत व्यक्तींची निवड करण्यात आली.
समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि जबाबदारीने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे परीक्षण करून विविध क्षेत्रांतील गुणवंत व्यक्तींची निवड करण्यात आली. कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजहितासाठी कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक केले तसेच अशा प्रेरणादायी उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.
“सौंदर्य कला पुरस्कार” हा केवळ पुरस्कार नसून सौंदर्य व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाला दिलेली कृतज्ञ मानवंदना आहे. या उपक्रमामुळे राज्यातील अनेक कलाकार, ब्युटी प्रोफेशनल्स आणि उद्योजकांना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. यावेळी आयोजकांच्या वतीने राज्यभरातून सहभागी झालेल्या सर्व मान्यवर, पुरस्कार विजेते, सहयोगी संस्था आणि उपस्थितांचे आभार मानण्यात आले. अधिक माहिती
राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ सोहळा उत्साहात संपन्न बी द चेंज फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ सोहळा रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथील आरंभ हॉलमध्ये अत्यंत उत्साह आणि थाटामाटात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी शिक्षकांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ तसेच मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
या सोहळ्यात देशातील विविध राज्यांमधील गुणवंत, समर्पित व सामाजिकदृष्ट्या बांधील असलेल्या शिक्षकांचा त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक योगदानासाठी सन्मान करण्यात आला. सर्वांगीण विद्यार्थी विकास, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि सामाजिक कल्याणासाठी राबवलेल्या उपक्रमांद्वारे या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
बी द चेंज फाउंडेशनच्या या उपक्रमामागील उद्देश शिक्षकांच्या कार्याची दखल घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे शिक्षकांचा सन्मान व प्रतिष्ठा वाढून शिक्षण क्षेत्र अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
अधिक माहितीWant to see our areas of Work. Click here to View More
Our NGO is recognized by the Government of India, and we have also received certification from NITI Aayog.
अर्जदार सौंदर्य, मेकअप, हेअरस्टाइल, स्किन केअर, ब्युटी ट्रेनिंग, फोटोग्राफी, फॅशन डिझाईन, किंवा संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक असावा.
अर्जदार सध्या नोंदणीकृत ब्युटी पार्लर, सलून, अकॅडमी, स्टुडिओ किंवा संस्थेशी कार्यरत असावा.
किमान १ वर्षाचा व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे.
सादर केलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे खरी, वैध आणि दिशाभूल न करणारी असावीत.
आयोजक समितीकडून अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची व पात्रतेची तपासणी/पडताळणी केली जाऊ शकते.
निलंबन, शिस्तभंग, किंवा कायदेशीर गुन्हा यांमध्ये सहभागी असलेला अर्जदार नामांकनासाठी पात्र राहणार नाही.
संस्थेच्या श्रेणीतील नामांकनासाठी, संबंधित संस्था कायदेशीररित्या नोंदणीकृत असावी.
सामाजिक उपक्रम किंवा सार्वजनिक हितातील कार्यासाठी नामांकन करताना, कार्याचा पुरावा (मीडिया कव्हरेज, सरकारी प्रमाणपत्र, NGO/CSR संलग्नता) आवश्यक आहे.
आवश्यक पुरावे जसे की प्रशिक्षण प्रमाणपत्र, ओळखपत्र, अनुभव प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त कोर्सचे सर्टिफिकेट इ. अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्जदार कोणत्याही न्यायालयीन गुन्ह्यात दोषी ठरलेला नसावा तसेच व्यावसायिक गैरवर्तनाचा आरोप सिद्ध झालेला नसावा.
खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास नामांकन तत्काळ रद्द करण्यात येईल आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.
आयोजक मंडळास कोणतेही नामांकन कारण न देता नाकारण्याचा अधिकार राहील.
पुरस्कार प्रक्रियेत सहभागी होताच वरील सर्व अटी व शर्तींची स्वीकृती दिली आहे असे गृहित धरले जाईल.
सौंदर्य क्षेत्रातील व्यावसायिक — जसे की मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट, स्किन एक्स्पर्ट, ब्युटी ट्रेनर्स, फॅशन व फोटोग्राफी क्षेत्रातील कलाकार — हे समाजात आत्मविश्वास, सौंदर्य आणि सर्जनशीलतेचा संगम घडवतात. त्यांच्या कल्पकतेमुळे आणि मेहनतीमुळे अनेक व्यक्तींना नवीन ओळख, नवा आत्मविश्वास आणि यश मिळते. या क्षेत्रात कार्य करणाऱ्या असंख्य प्रतिभावान कलाकारांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहते. या समर्पित आणि उत्कृष्ठ व्यक्तींचा गौरव करण्यासाठी “बी द चेंज फाउंडेशन” (नोंदणीकृत) अभिमानाने सादर करत आहे — “सौंदर्य कला पुरस्कार २०२६”, जो सौंदर्य क्षेत्रातील उत्कृष्टता, नवोन्मेष आणि प्रेरणादायी कार्याचा सन्मान करतो.
दिनांक : १८ जानेवारी २०२६
बी दि चेंज फाउंडेशन यांच्या वतीने मुंबई येथे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६ अत्यंत यशस्वी व दिमाखदार पद्धतीने आयोजित करण्यात आला. या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश देशभरातील आदर्श, गुणवंत व कर्तृत्ववान शिक्षकांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करणे हा होता.
या पुरस्कार सोहळ्यास भारतातील विविध राज्यांमधील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवर पाहुण्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली. शिक्षकांच्या राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाचा गौरव करणारा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी ठरला.
मुंबई येथे झालेल्या आमच्या कार्यक्रमातील शिक्षकांचा अनुभव
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या आमच्या कार्यक्रमात शिक्षकांनी Be The Change Foundation बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या उपक्रमांमुळे शिक्षकांना प्रेरणा, सन्मान आणि नवी ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी मनापासून सांगितले.
हे अनुभव आमच्या कामाचा खरा प्रभाव दर्शवतात — शिक्षण क्षेत्र बळकट करणे आणि शिक्षकांचा सन्मान करणे हेच आमचे ध्येय आहे.
नामांकित व्यक्ती ही नोंदणीकृत ब्युटी, मेकअप, हेअर, स्किन केअर, फॅशन किंवा फोटोग्राफी क्षेत्रातील व्यावसायिक असावी.
आपल्या कार्यामध्ये सातत्याने नैतिकता, सर्जनशीलता आणि ग्राहक-केंद्रित सेवा दाखवलेली असावी.
कोणत्याही प्रकारचे शिस्तभंग, गैरवर्तन, किंवा कायदेशीर कारवाईचे प्रकरण प्रलंबित नसावे.
आपल्या क्षेत्रात उत्कृष्टता दर्शवणारे नाविन्यपूर्ण तंत्र, डिझाईन, स्टाइलिंग किंवा क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट्स यांचा पुरावा असावा.
प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि व्यावसायिक जबाबदारी या तत्त्वांचे पालन केलेले असावे.
समाजातील सकारात्मक बदलासाठी सोशल इनिशिएटिव्ह, मोफत प्रशिक्षण शिबिरे, ग्रामीण भागातील सेवा, किंवा महिलांसाठी सक्षमीकरण उपक्रम केलेले असावेत.
ग्राहक समाधान, सोशल मीडिया किंवा कम्युनिटी फीडबॅक यावर आधारित प्रतिष्ठा किंवा मान्यता असावी.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर — जसे की डिजिटल मेकअप, ऑनलाईन ब्युटी ट्रेनिंग, फॅशन फोटोग्राफी, किंवा ट्रेंडिंग स्टाइल इनोव्हेशन केलेले असावे.
टीमवर्क, नेतृत्व आणि सहयोगी वृत्ती दाखवलेली असावी.
प्रशिक्षण, स्किल डेव्हलपमेंट, वर्कशॉप्स किंवा मास्टरक्लासेसद्वारे सतत शिक्षण आणि प्रगतीची वृत्ती असावी.
व्यावसायिक अनुभव किमान १ वर्षाचा असावा (अत्यंत नाविन्यपूर्ण किंवा प्रेरणादायी कार्य असल्यास अपवाद मान्य).
स्पर्धा, प्रदर्शन, फॅशन शो, सेमिनार, ब्युटी कॅम्प्स इत्यादींमध्ये सक्रीय सहभाग केलेला असावा.
क्रिएटिव्हिटी, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारी या तिन्हींचा सुंदर संगम आपल्या कार्यातून दिसला पाहिजे.
विशेष विचार त्या कलाकारांना केला जाईल ज्यांनी कोविड किंवा इतर संकट काळात समाजासाठी नि:स्वार्थ सेवा दिली आहे.
उद्योगातील योगदान व प्रेरणादायी प्रभाव — आपल्या कार्यामुळे इतर कलाकारांना प्रेरणा मिळाली असेल किंवा उद्योगातील विकासात मोलाचे योगदान दिलेले असावे.
ब्रँड, संस्था किंवा सामाजिक उपक्रमांद्वारे सकारात्मक प्रतिमा निर्माण — समाजात, ग्राहकांमध्ये किंवा ब्युटी इंडस्ट्रीत आपल्या नावाची विश्वासार्ह आणि सन्माननीय ओळख निर्माण झालेली असावी.
Ans. “Be The Change Foundation” तर्फे आयोजित हा पुरस्कार कार्यक्रम महाराष्ट्रातील ब्युटी, मेकअप, हेअर, स्किन, स्पा, नेल आर्ट आणि फॅशन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यासाठी आहे.
Ans. ब्युटी एक्स्पर्ट, मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, स्किन थेरपिस्ट, स्पा प्रोफेशनल, नेल आर्टिस्ट, फॅशन डिझायनर, सलून/अकॅडमी मालक तसेच ब्युटी क्षेत्रातील प्रशिक्षक व संस्थापक अर्ज करू शकतात.
Ans. www.saundaryapuraskar.com या संकेतस्थळावर “नामांकन भरा” या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
Ans. होय, तुम्ही वेबसाईटवरून नामांकन फॉर्म डाउनलोड करून तो भरावा व आवश्यक कागदपत्रांसह saundaryapuraskar@gmail.com या ईमेलवर पाठवावा.
Ans. व्यावसायिक प्रमाणपत्र, ओळखपत्र (आधार/पॅन), सलून/अकॅडमी नोंदणी पुरावा, अनुभव प्रमाणपत्र, पुरस्कार किंवा मीडिया कव्हरेजचे पुरावे, तसेच ग्राहक अभिप्राय असल्यास जोडावेत.
Ans. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२६ आहे.
Ans. सर्व अर्ज “Be The Change Foundation” च्या तज्ज्ञ समितीद्वारे तपासले जातील. निवड कौशल्य, गुणवत्ता, समाजातील योगदान आणि प्रामाणिकतेच्या आधारे केली जाईल.
Ans. विजेत्यांना ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल व विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.
Ans. नामांकन शुल्क फक्त राज्यस्तरीय साठी ₹३०००/- इतके तर राष्ट्रीय पुरस्कार साठी ₹५०००/- इतके आहे- असून ते वेबसाईटवरून ऑनलाइन भरता येईल.
Ans. पुरस्कार वितरण सोहळा ६ सप्टेंबर २०२६ रोजी शिर्डी येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.
Ans.
📧 saundaryakalaa@gmail.com
🌐 www.saundaryapuraskar.com
📞 +91 7719032192
अध्यक्ष, बी द चेंज फाउंडेशन
संचालक, स्केलझेन टेक्नॉलॉजी'ज प्रायव्हेट लिमिटेड
https://scalezen.in/
मयूर ढोकचौळे हे Scalezen Technologies Private Limited या शैक्षणिक सल्लागार कंपनीचे संस्थापक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांचा प्रचंड अनुभव असून, त्यांनी CBSE शाळा, इंग्रजी माध्यम शाळा आणि NDA अकॅडमीमध्ये पाच वर्षे प्राचार्य म्हणून यशस्वी कारकीर्द बजावली आहे.
फक्त एका संस्थेपुरते मर्यादित न राहता, ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचावे या उद्देशाने त्यांनी Scalezen Technologies Pvt. Ltd. ची स्थापना केली. या कंपनीमार्फत ते विविध शाळा, कॉलेजेस आणि NDA/NEET/JEE अकॅडमीसाठी शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन, व्यवस्थापन सुलभीकरण आणि टेक्नॉलॉजी सोल्युशन्स देत आहेत.
ScaleZen ही कंपनी सध्या शाळा, कॉलेजेस, इंजिनिअरिंग आणि मेडिकल महाविद्यालये अशा विविध प्रकारच्या ३० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांमध्ये आपली कन्सल्टन्सी सेवा पुरवत आहे. या सर्व संस्थांमध्ये ScaleZen कंपनी अकॅडेमिक, ऍडमिनीट्रेशन, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, अॅडमिशन कन्सल्टन्सी, शैक्षणिक धोरण आखणी आणि व्यवस्थापन या क्षेत्रात सल्ला व सेवा पुरवत आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्यात, अभ्यासक्रमानुसार सराव करता यावा यासाठी त्यांनी "परीक्षा पोर्टल" या मोबाइल व वेब ॲपची निर्मिती केली आहे. आज अनेक विद्यार्थी या ॲपचा लाभ घेत असून, त्याचा उपयोग दैनिक सराव, डेली टेस्ट्स, स्टडी मटेरियल आणि निकाल व्यवस्थापनासाठी केला जातो.
अध्यक्ष, सौंदर्य कला पुरस्कार २०२६
मा. रचना साळुंके मम् ह्या "सौंदर्य कला पुरस्कार २०२६" च्या उपाध्यक्ष असून, या उपक्रमामागील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. सौंदर्य, कला आणि फॅशन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य आणि उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्याचा त्यांचा दृढ हेतू आहे. मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट, स्किन एक्स्पर्ट, ब्युटिशियन, फॅशन आर्टिस्ट, फोटोग्राफर आणि ब्युटी इंडस्ट्रीतील कार्यरत कलाकार यांना त्यांच्या निष्ठा आणि कर्तृत्वासाठी योग्य सन्मान मिळावा — हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
त्यांचा ठाम विश्वास आहे की “प्रत्येक समर्पित आणि सर्जनशील कलाकाराचा सन्मान होणे आवश्यक आहे.” ह्या विचारातूनच मा. रचना साळुंके मम् यांनी“बी. द चेंज फाउंडेशन”च्या माध्यमातून “सौंदर्य कला पुरस्कार २०२६” ही संकल्पना साकारली आहे, जी महाराष्ट्रभरातील प्रेरणादायी आणि उत्कृष्ट कलावंतांचा गौरव करते.
मा. रचना साळुंके मम् यांचा हा उपक्रम प्रत्येक कलाकारासाठी प्रेरणास्त्रोत ठरतो, जो आपल्या कार्यात समर्पण, सर्जनशीलता आणि प्रामाणिकपणा जपत समाजात सकारात्मक बदल घडवतो. हा पुरस्कार सोहळा त्यांच्या कलात्मक कार्याचा सन्मान करतो, त्यांना योग्य मान्यता देतो आणि नव्या पिढीला आपल्या क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची प्रेरणा देतो.